Friday, 15 November 2019

शाखा कार्यवाह


सिद्धेश्वर सायं शाखा सुरु होऊन पाच सहा महिने झाले होते. वसमत तालुका तोपर्यंत परभणी जिल्ह्यात होता. पण १ मे१९९९ या दिवशी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती शासकीय दृष्ट्या झाली तसेच संघदृष्ट्या देखील झाली. आणि नविन जिल्ह्याला नविन जिल्हा प्रचारक श्री किरण शरद देशपांडे हे आले.

पाच सहा महिन्यातील एकंदरीत शाखेमध्ये खेळसूर्यनमस्कारसमता इत्यादी गोष्टी व्हायच्या. एक-दोन उत्सवही झाले. आणि संपर्काला जायचे म्हणजे शाखेला जात असताना स्वयंसेवकांना त्यांच्या घराच्या बाहेर हाक मारायची असेच व्हायचे. कारण एकाच गल्लीत अनेक वर्षांपासून रहात असल्यामुळे अनोळखी असं फारसं कोणी नव्हतं. म्हणून संपर्काचा असा प्रत्यक्ष अनुभव देखील कधी आला नव्हता. नव्हे तसे कुणाला संपर्क करताना पाहिले देखील नव्हते. पुढे किरणजींच्या निमित्ताने तो अनुभव आला. आणि अशा पद्धतीने त्यांनी अनुभव दिला कीती पद्धततो संपर्क आणि तो प्रसंग अगदी आजही डोळ्यासमोर स्पष्टपणे आहे.

वसमतला सलग दोन-तीन दिवसांसाठी किरणजी प्रवासाला आले होते. पहिल्या दिवशी शाखा झालीपण संपर्काचे काही माहीतच नसल्यामुळे शाखा झाल्यावर आम्ही माझ्या घरी गेलो. पण दुसऱ्या दिवशी एका स्वयंसेवकाकडे जायचे ठरले. तसा शाखेत त्याला निरोप दिला व संपर्क ही झाला. त्या स्वयंसेवकाची आणि त्याच्या वडीलांशी गप्पागोष्टी झाल्या. वैयक्तिक चौकशी झाली. अर्थात हे सगळं किरणजींनी केले व चहा घेऊन निघालो. पण त्या संपर्कानंतर किरणजी म्हणाले, "आता उद्या देखील संपर्काला जाऊया. पण उद्या मी सोबत तर असेणपण मी काहीच बोलणार नाही. तुलाच बोलावे लागेल."

मनातल्या मनात मला वाटले कीअसे कसे होईल. जिल्हा प्रचारक शांत कसे बसतील. आणि त्यात किरणजींचा स्वभाव खूप बोलका. म्हणून मी अगदी बिनधास्त होतो.

तिसऱ्या दिवशी शाखा झाली. ठरल्याप्रमाणे संपर्काला गेलो. त्या स्वयंसेवकाच्या घरातील बैठकीत तोत्याचे वडीलमी व किरणजी असे चौघेही बसलो होतो. आणि सांगितल्याप्रमाणे किरणजी काहीही बोलत नव्हते. मला काय बोलावे काही सुचत नव्हते. मी त्या स्वयंसेवकाशी किंवा त्याच्या वडिलांशी एक अक्षरही बोलू शकलो नाही. अगदी चहा संपेपर्यंत किरणजींकडे अपेक्षेने मी अनेक वेळा पाहिले कीआता बोलतील म्हणून. पण शेवटपर्यंत ते काहीही बोलले नाही.
अर्थात तो दिवस माझ्या प्रशिक्षणाचा होता. पण प्रशिक्षणाचा प्रकार खूपच अवघड होता.

दिवस निघून गेला. पण शाखा कार्यवाह म्हणून संपर्क कसा करायचायाची जाणीव झाली. म्हणून आता ठरवले,  सगळी काही ओळख असताना आपण बोलू शकलो नाही. पण आता संपर्क तर आलाच पाहिजे.

पुढे नित्य संपर्काला जायला लागलो.
पण प्रसंग एवढ्यावरच संपर्क शिकवून माझ्यासाठी थांबणार नव्हता. संघ कार्याच्या अलौकिक कार्य पद्धतीचा आणि दायित्वाचा शाखा कार्यवाह म्हणून अनुभव देखील यायचा होता.

एके दिवशी असाच संपर्काला गेलो असतानाएका पालकांशी गप्पा मारत होतो तर ते पालक सहज म्हणाले, "थोडंसं  तुम्ही आमच्या मुलाला अभ्यास करायचेही सांगा. कारण तो नुसता खेळत असतो."
उत्तरादाखल मी काही बोलू शकलो नाही. केवळ आश्चर्यचकीत झालो.

साधारण शिशु स्वयंसेवक ते दहावीपर्यंतचे बाल अशी शाखेतील एकंदरीत स्वयंसेवकांची उपस्थिती होती. आणि मी  विज्ञान शाखेच्या पदवीच्या पहिल्या वर्षात होतो. त्या बाल स्वयंसेवकाला अभ्यास करायला सांगणे खरंतर ही गोष्ट वरवर पाहता खूप सुखावणारी होती कीआपल्यात काहीतरी आहेअसं जाणवणार होती.
पण पुढे सलग पाच सहा दिवस संपर्काला गेलो असतानाहाच अनुभव आला.

आता मात्र लक्षात आले कीकाहीतरी गडबड आहे. कारण तसे पाहता पहिली ते बारावी या वर्षांमध्ये मी केवळ फर्स्टक्लास या श्रेणीत कायम पास होत आलेलो होतो.  डिस्टिंक्शन वा पहिल्या पाचमध्ये येणारा देखील मी कधी विद्यार्थी नव्हतो. मग अचानक अशा साधारण विद्यार्थ्याकडून पालक अपेक्षा का करताहेतयाचा खूप विचार केला. आणि विचारांती लक्षात आले कीया पालकांपैकी कुणीही  वैयक्तिकरित्या माझ्याकडून त्यांच्या पाल्याविषयी अपेक्षा ठेवत नव्हते. तर माझ्या मागे 'शाखा कार्यवाहहे बिरुद  लागले होतेत्या शाखा कार्यवाह कडून अपेक्षा ठेवत होते.

बहुतेक त्या सर्वच पालकांपैकी कुणीही शाखेत गेले नव्हते. संघ कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव देखील त्यांना नव्हता. पण कदाचित गेल्या काही महिन्यात आपल्या पाल्याच्या वर्तणुकीतील झालेला बदल त्यांना जाणवलेला असावा.

संघकार्याच्या अलौकिक कार्य पद्धतीतून तयार झालेल्या 'शाखा कार्यवाहया दायीत्वाची पहिल्यांदा जाणिव झालीगांभीर्य अनुभवले.

संदर्भ व संपर्कसूत्र - 
श्री किरण शरद देशपांडेपूणे
९७६४३२८३८४


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

2 comments:

  1. छान कार्यवाह दायित्व चे अनुभवकथन

    ReplyDelete

बरे झाले, पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले...

विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात होतो. परंतु विज्ञान सोबतच वाद-विवाद, वक्तृत्व, कविता, कथाकथन, एकांकिका असे एकंदरीतच कलेशी जास्त नाळ जोडली गेली...