Friday, 15 November 2019

कंगवा आणि समाजसेवा


वसमत शहरात बालांची शाखा सुरू झाली होती. एक साप्ताहिक मिलन सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणात ही सुरू झाले होते. दोन हजार एक सालची गोष्ट आहे. परंतु एवढ्या धिम्या गतीने काम करून कसे चालेल? असा सातत्याने प्रश्न पडायचा. त्यात एवढा मोठा समाज, त्याला आपण कसे पुरू शकतो? असेही वाटायचे. संघाचे काम अधिक गतीने कसे वाढेल किंवा वाढेल का? असे विचार मनात यायचे.

मग एके दिवशी वसमत शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.चंद्रसेन दिवाण यांना सहज भेटायला गेलो असताना, हा विषय निघाला. त्यावर डॉक्टर म्हणाले, "सगळेच संघात येतील असे नक्कीच होणार नाही. नव्हे तशी संघाची अपेक्षाही नाही. पण सगळेच समाजसेवी असावे, याचा आग्रह संघ नक्कीच करतो. म्हणून संघ समाजसेवेचे काम करतो."

आता मात्र मी आणखीनच बुचकळ्यात पडलो. एकीकडे सगळेच संघात येणार नाहीत, हे माहीत आहे. तर दुसरीकडे सगळे समाजसेवी व्हावे, ही अपेक्षा वास्तववादी वाटत नव्हती.

परंतु डॉ.दिवाण यांनी ज्येष्ठ प्रचारक मा.दामुअण्णा दाते यांनी सांगितलेला एक दाखला दिला, तेव्हा पटले.

डॉ.दिवाण म्हणाले, "दामुअण्णा दाते यांनी एका बैठकीत एक कंगव्याचे उदाहरण दिले. दामुअण्णा यांनी हातामध्ये एक कंगवा घेतला व सगळ्यांना उद्देशून म्हणाले, 'बघा हा कंगवा किती आकर्षक आहे. त्यावर नक्षीकाम सुंदर आहे. रंग मोहक आहे. हातात पकडायला एकदम छान आहे. त्यावरून बोटे फिरवली तर छान आवाज येतो.

परंतू... या कंगव्याने भांग पाडता येत नाही.
काही उपयोग आहे का मग या कंगव्याचा?

अगदी असेच व्यक्तीचे देखील आहे. त्या त्या व्यक्तीने आपआपल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे. यश, किर्ती, पैसा सर्व काही मिळवलेले आहे.

परंतु ती व्यक्ती समाजसेवी नाही. ती व्यक्ती त्या भांग न पाडता येणाऱ्या कंगव्याप्रमाणेच आहे."

तात्पर्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्ती निर्माणाचे कार्य शाखेच्या माध्यमातून करतो. मग तेच स्वयंसेवक अगदी प्रेरणेने समाजसेवेचे व्रत स्विकारत असतात.

पण समाज म्हणुन प्रत्येक व्यक्तीने संघटना कोणतीही असो, संस्था कोणतीही असो किंवा माध्यम कोणतीही असो जीवनातील काही भाग समाजकार्याला कोणत्यानाकोणत्या प्रकारे देणे व्यक्तीच्या व समाजाच्या, दोघांच्याही हिताचे आहे.

संदर्भ व संपर्कसूत्र :- डॉ.चंद्रसेन दिवाण - ९४२००८१७५५

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

शाखा कार्यवाह


सिद्धेश्वर सायं शाखा सुरु होऊन पाच सहा महिने झाले होते. वसमत तालुका तोपर्यंत परभणी जिल्ह्यात होता. पण १ मे१९९९ या दिवशी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती शासकीय दृष्ट्या झाली तसेच संघदृष्ट्या देखील झाली. आणि नविन जिल्ह्याला नविन जिल्हा प्रचारक श्री किरण शरद देशपांडे हे आले.

पाच सहा महिन्यातील एकंदरीत शाखेमध्ये खेळसूर्यनमस्कारसमता इत्यादी गोष्टी व्हायच्या. एक-दोन उत्सवही झाले. आणि संपर्काला जायचे म्हणजे शाखेला जात असताना स्वयंसेवकांना त्यांच्या घराच्या बाहेर हाक मारायची असेच व्हायचे. कारण एकाच गल्लीत अनेक वर्षांपासून रहात असल्यामुळे अनोळखी असं फारसं कोणी नव्हतं. म्हणून संपर्काचा असा प्रत्यक्ष अनुभव देखील कधी आला नव्हता. नव्हे तसे कुणाला संपर्क करताना पाहिले देखील नव्हते. पुढे किरणजींच्या निमित्ताने तो अनुभव आला. आणि अशा पद्धतीने त्यांनी अनुभव दिला कीती पद्धततो संपर्क आणि तो प्रसंग अगदी आजही डोळ्यासमोर स्पष्टपणे आहे.

वसमतला सलग दोन-तीन दिवसांसाठी किरणजी प्रवासाला आले होते. पहिल्या दिवशी शाखा झालीपण संपर्काचे काही माहीतच नसल्यामुळे शाखा झाल्यावर आम्ही माझ्या घरी गेलो. पण दुसऱ्या दिवशी एका स्वयंसेवकाकडे जायचे ठरले. तसा शाखेत त्याला निरोप दिला व संपर्क ही झाला. त्या स्वयंसेवकाची आणि त्याच्या वडीलांशी गप्पागोष्टी झाल्या. वैयक्तिक चौकशी झाली. अर्थात हे सगळं किरणजींनी केले व चहा घेऊन निघालो. पण त्या संपर्कानंतर किरणजी म्हणाले, "आता उद्या देखील संपर्काला जाऊया. पण उद्या मी सोबत तर असेणपण मी काहीच बोलणार नाही. तुलाच बोलावे लागेल."

मनातल्या मनात मला वाटले कीअसे कसे होईल. जिल्हा प्रचारक शांत कसे बसतील. आणि त्यात किरणजींचा स्वभाव खूप बोलका. म्हणून मी अगदी बिनधास्त होतो.

तिसऱ्या दिवशी शाखा झाली. ठरल्याप्रमाणे संपर्काला गेलो. त्या स्वयंसेवकाच्या घरातील बैठकीत तोत्याचे वडीलमी व किरणजी असे चौघेही बसलो होतो. आणि सांगितल्याप्रमाणे किरणजी काहीही बोलत नव्हते. मला काय बोलावे काही सुचत नव्हते. मी त्या स्वयंसेवकाशी किंवा त्याच्या वडिलांशी एक अक्षरही बोलू शकलो नाही. अगदी चहा संपेपर्यंत किरणजींकडे अपेक्षेने मी अनेक वेळा पाहिले कीआता बोलतील म्हणून. पण शेवटपर्यंत ते काहीही बोलले नाही.
अर्थात तो दिवस माझ्या प्रशिक्षणाचा होता. पण प्रशिक्षणाचा प्रकार खूपच अवघड होता.

दिवस निघून गेला. पण शाखा कार्यवाह म्हणून संपर्क कसा करायचायाची जाणीव झाली. म्हणून आता ठरवले,  सगळी काही ओळख असताना आपण बोलू शकलो नाही. पण आता संपर्क तर आलाच पाहिजे.

पुढे नित्य संपर्काला जायला लागलो.
पण प्रसंग एवढ्यावरच संपर्क शिकवून माझ्यासाठी थांबणार नव्हता. संघ कार्याच्या अलौकिक कार्य पद्धतीचा आणि दायित्वाचा शाखा कार्यवाह म्हणून अनुभव देखील यायचा होता.

एके दिवशी असाच संपर्काला गेलो असतानाएका पालकांशी गप्पा मारत होतो तर ते पालक सहज म्हणाले, "थोडंसं  तुम्ही आमच्या मुलाला अभ्यास करायचेही सांगा. कारण तो नुसता खेळत असतो."
उत्तरादाखल मी काही बोलू शकलो नाही. केवळ आश्चर्यचकीत झालो.

साधारण शिशु स्वयंसेवक ते दहावीपर्यंतचे बाल अशी शाखेतील एकंदरीत स्वयंसेवकांची उपस्थिती होती. आणि मी  विज्ञान शाखेच्या पदवीच्या पहिल्या वर्षात होतो. त्या बाल स्वयंसेवकाला अभ्यास करायला सांगणे खरंतर ही गोष्ट वरवर पाहता खूप सुखावणारी होती कीआपल्यात काहीतरी आहेअसं जाणवणार होती.
पण पुढे सलग पाच सहा दिवस संपर्काला गेलो असतानाहाच अनुभव आला.

आता मात्र लक्षात आले कीकाहीतरी गडबड आहे. कारण तसे पाहता पहिली ते बारावी या वर्षांमध्ये मी केवळ फर्स्टक्लास या श्रेणीत कायम पास होत आलेलो होतो.  डिस्टिंक्शन वा पहिल्या पाचमध्ये येणारा देखील मी कधी विद्यार्थी नव्हतो. मग अचानक अशा साधारण विद्यार्थ्याकडून पालक अपेक्षा का करताहेतयाचा खूप विचार केला. आणि विचारांती लक्षात आले कीया पालकांपैकी कुणीही  वैयक्तिकरित्या माझ्याकडून त्यांच्या पाल्याविषयी अपेक्षा ठेवत नव्हते. तर माझ्या मागे 'शाखा कार्यवाहहे बिरुद  लागले होतेत्या शाखा कार्यवाह कडून अपेक्षा ठेवत होते.

बहुतेक त्या सर्वच पालकांपैकी कुणीही शाखेत गेले नव्हते. संघ कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव देखील त्यांना नव्हता. पण कदाचित गेल्या काही महिन्यात आपल्या पाल्याच्या वर्तणुकीतील झालेला बदल त्यांना जाणवलेला असावा.

संघकार्याच्या अलौकिक कार्य पद्धतीतून तयार झालेल्या 'शाखा कार्यवाहया दायीत्वाची पहिल्यांदा जाणिव झालीगांभीर्य अनुभवले.

संदर्भ व संपर्कसूत्र - 
श्री किरण शरद देशपांडेपूणे
९७६४३२८३८४


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

संपर्क रक्षाबंधनाचा


कल्पकतानिर्भीडपणा आणि मनाचा निर्मळपणा या जणू बालवयातील भगवंतांनी दिलेल्या देणग्या असतात. थोरा मोठ्यांनीही अचंबीत व्हावंअसं कार्य ही लहान मुल करतात. अशा वेळी केवळ त्यांच्याशी पूरक अशी योजना वडीलधाऱ्या मंडळींनी करायची असते.

आणि त्यातही याच बालवयात जर सामाजिक जीवनाची जोड दिली तर निश्चितच सामूहिक सामाजीक भविष्य उज्वल होतं.

आणि ह्याच गोष्टीचा अनुभव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असताना
वसमत शहरातील सिद्धेश्वर सायं शाखेच्या रक्षाबंधनाच्या उत्सवाच्या संपर्काच्या निमित्ताने आला.

२००१ सालची गोष्ट आहे. रक्षाबंधनाच्या संपर्कासाठी सिद्धेश्वर सायं शाखेची बैठक झाली. शासकीय  रुग्णालय आणि त्याच परिसरातील व्यापारी वर्ग व त्याला लागूनच असलेले पोलीस स्टेशन येथे संपर्कला जायचेअसे बैठकीत ठरले.
त्यानुसार दोन-दोन स्वयंसेवकांची रचनाही झाली. आणि असे आम्ही सगळेजण संपर्काला निघालो.

मी सरकारी रुग्णालयातील रुग्णांना राख्या बांधण्यासाठी गेलो. बाजारपेठेत काही स्वयंसेवक गेले. आणि दोन स्वयंसेवक पोलीस स्टेशन मध्ये गेले.

त्यात अजिंक्य शशिकांत देशपांडे हा इयत्ता सहावी शिकणारा एक बाल स्वयंसेवक होता. माझ्या दृष्टीने मुख्य पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना राखी बांधली म्हणजे आपला संपर्क झालाअसे मला वाटत होते .

पण प्रत्यक्ष अजिंक्य राख्या बांधून आलातो सोबत वेगळाच अनुभव घेऊन.

सगळेजणं अनुभव सांगण्यासाठी जेव्हा जमलो तेव्हा अजिंक्य म्हणाला, "सगळ्या पोलिसांना राखी बांधलीपोलीस इन्स्पेक्टर साहेबांना देखील राखी बांधली. आणि बाहेर येत असताना शेजारच्या कोठडीत 'चोरबसलेला होतात्याला देखील राखी बांधली."
भितीसंकोच हे तर अर्थात नव्हतेच.

पण 'सर्वस्पर्शी', 'सर्वव्यापीसंघकार्य अशाच प्रकारच्या संपर्काने होईलयाची शब्दशः अनुभूती आली.

( संदर्भ व संपर्क सूत्र – श्री अजिंक्य शशिकांत देशपांडे (९४०३१९६९६४), वंदे मातरम् प्रभात शाखेचा स्वयंसेवक, डॉ.हेडगेवार नगर, संभाजीनगर शहर जिल्हा )


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

मंगळवार आणि हेडगेवार


पहिल्यांदाच गाव सोडून परप्रांतात नोकरीनिमित्त जाण्याचा योग आला, तो सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रात. 2004 साल होते. आजपर्यंत संघाच्या संपर्कात वाढलो होतो. पण पहिल्यांदाच विश्व हिंदू परिषदेचा संबंध आला. तो माझा बालमित्र व विहिंपचा सातारा जिल्हा प्रचारक श्री अविनाश कुलकर्णी याच्यामुळे. शाळेनंतर प्रथमच जवळजवळ एक वर्ष सोबत रहायला मिळाले.

मग श्री बाबूजी नाटेकर, प.महा.विहिंप, प्रांत मंत्री यांचा परिचय झाला. नंतर काही वेळा भेटीही झाल्या.

आणि एकदा एका बैठकीचा निरोप मिळाला. श्री मिलींदजी परांडे, विहिंप केंद्रीय कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक मंगळवारी होती. बैठकीनंतर नाष्टया होता.
आणि मी मंगळवार कुलदेवतेचा दिवस म्हणून उपवास करायचो. आणि काही केल्या उपवास मोडायचा नाही, हा माझा संकल्प होता.

मला एक प्रकारे संकोच वाटला की, आता बैठकीला कसे जायचे? बाबूजींच्या घरीच बैठक होती. बैठकीनंतर नाष्टयाची व्यवस्थाही केली होती. आपल्यालाही नाष्टया करावे लागेल! संघ कार्य करत असताना, स्वयंसेवकाच्या घरी मिळेल ते खावे, आपल्याला केवळ 'हेडगेवार' असला पाहिजे. अशा समजूतीमध्ये मी होतो. अर्थात ही माझी धारणा होती. त्यामुळे मी मंगळवार सोडून संपर्क जायचो.

पण मग बैठकीलाही जायचे की नाही? हा माझ्या समोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला. कारण श्री मिलिंदजी परांडे यांचे वसमतला राष्ट्र जागरण अभियानामध्ये बौद्धिक ऐकायला मिळाले होते. खूप आवडले होते. म्हणून परत त्यांचा सहवास अनुभवण्याचा क्षण मला सोडायचा नव्हता.

मग योगायोगाने बाबूजींची भेट झाली. आणि न राहून माझी अडचण मी त्यांना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता बाबूजी म्हणाले, "अरे संघाचे काय किंवा विहिंपचे काय, काम हे भक्तीचेच आहे. त्यामुळे तू तुझा उपवास मोडू नकोस, तू फक्त ये."

मी माझ्या मनाची तयारी करून गेलो. कारण बाबूजी म्हणाले होते, म्हणून. मग बैठक झाली. अर्थातच मिलींदजींनी मांडलेला विषय खूपच सुंदर होता. 
सगळ्यांचा परिचय झाला. मग सगळे नाष्टयासाठी बसले. आणि केवळ मला उपवासाचा फराळ देण्यात आला. उर्वरित सगळे कार्यकर्ते नाष्टया करायला लागले. मी मात्र आश्चर्यचकित झालो होतो. डोळ्यात पाणी यायचेच शिल्लक होते. माझ्याकडे काहीही जबाबदारी नव्हती. केवळ काही दिवसांचा परिचय होता. पण एका प्रांत मंत्र्यांनी अगदीच सामान्य स्तरावरच्या कार्यकर्त्याच्या आस्थेची घेतलेली ही सर्वोच्च काळजी होती. जी मी प्रत्यक्ष अनुभवली. अन्यथा बैठकीचा व्याप, केंद्रीय कार्यकर्त्यांचा प्रवास, बैठकीचे विषय, स्वत:च्याच घरच्या बैठकीची व्यवस्थेची तयारी, अशा कितीतरी गोष्टी होत्या. पण अगदी लक्षपूर्वक उपवासाच्या फराळाची त्यांनी व्यवस्था केली होती.

उद्देश एकच केवळ 'उपवास मोडला नाही पाहिजे' असेच नाही तर 'हेडगेवार' करत असताना 'मंगळवार' मोडल्या जात नाही, याचा अनुभव द्यायचा होता.

उपवासाने जेवढे पुण्य मिळेल असे वाटले होते, तेवढाच आनंद आणि धन्यता बाबुजींसारख्या देवदुर्लभ ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सहवासाने आणि त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे मिळाली.

आणि पहिल्यांदा अनुभवले, ऐकले होतेच संघकार्य ईश्वरी कार्य आहे ते बाबूजीं सारख्या कार्यकर्त्यांमुळेच...

संदर्भ व संपर्क सूत्र - श्री बाबूजी नाटेकर - ९८५००४३०२९


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

नारायणमामा


बहुदा 'स्वयंप्रेरणाहीच 'स्वयंसेवकहोण्याचीअसण्याची किंवा घडण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची बाब आहे.

म्हणूनच 'स्वयंसेवकहे दायित्व संघ निर्मात्या डॉ.हेडगेवार यांनी व्यक्ती निर्माणाच्या या संघकार्यात सर्वतोपरी मानले आणि प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनात अनेक उदाहरणे देखील प्रस्थापित केलेली आहेत.

आणि म्हणूनच की कायपुढे अशी  'स्वयंसेवकअसण्याची अनेक उदाहरणे अनेक स्वयंसेवकांच्या जीवनात आलेली पाहायला मिळतात. त्यातीलच एक उदाहरण...

नारायण मामा.
मामा होतेते आईचे. परंतु व्यक्तिमत्त्व असे कीनातवंडांनीही 'मामाम्हणावं.

अपार कष्टाने शेतात काम करून कमावलेली शरीरयष्टी. पिळदार देह. रुबाबदार असं व्यक्तिमत्व.
पूर्णेच्या च्या हिवाळी शिबिरात(८७ किंवा ८८ साली) त्यांना भेटल्याचंपाहिल्याचं आजही स्पष्टपणे पण आठवतं. संचलनात घोड्यावर ध्वज घेऊन बसले होते.
तसेच शिबिर म्हटलं कीप्रत्येक वेळेस नारायण मामा स्वयंपाक विभागात असायचे.

सावंगीया परभणी जिल्ह्यातील एका छोट्या गावातील रहिवासी.

नातेवाईकांच्या देखील अनेक लग्नात कोठीघराची जबाबदारी नकळतपणे त्यांच्याकडेच असायची. आई सांगते की८७ साली मावशीच्या लग्नातजेव्हा आचारी पोहोचला नव्हतातेव्हा जेवणाची वेळ जवळ येत आहे असे पाहून नारायणमामांनी स्वतः आढी(चूल) तयार केली. विटा मातीनी सारवल्या. चूल पेटवली. वरण शिजायला टाकले. आणि ते शिजत आल्या नंतर केव्हातरी आचारी आला.
अर्थात कोणतीही गोष्ट स्वीकारल्यानंतर ती मुळापासून आणि पूर्णपणे करायची. त्याकरिता कोणाचीही वाट पाहायची नाही.

अशी सर्व भूमिकेतून स्वयंसेवक म्हणून नारायणमामा स्वतःची साधना पूर्ण करत होते.

आणि एके दिवशी त्यांच्या साधनेचा परमोच्च बिंदू येण्याचा प्रसंग आला.

१९६५ वर्ष होते.
श्रीगुरुजी सेलू येथे येणार होते. परभणी जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवकांची त्यानिमित्ताने बैठक ठेवलेली होती. नारायणमामा देखील बैठकीला जाणार होते.

पण बैठकीच्या दोन-तीन दिवस आधी घरात मुलीचा जन्म झाला. आणि त्यानंतर मात्र मुलीची प्रकृती खालावत गेली. आणि बैठकीच्याच दिवशी मुलगी जात राहिली.

घरात शोकाकुल वातावरण तयार झालं. दुःखाला पारावार नव्हता. पण नारायणमामांनी शोक आवरला. अक्षरशः पत्नीच्यामांडीवरून मुलीला उचलून घेतलं. स्वतः पुढाकार घेऊन विधीवत अंत्यसंस्कार केले. आणि घरी येऊन आंघोळ आदी आटपून पुढच्या कोणत्याही बंधनात न अडकता बैठकीला निघून गेले.

वस्तुस्थितीत नारायणमामांकडे बैठकीचे कोणतेही दायित्व नव्हते. केवळ 'स्वयंसेवकहेच दायित्व होते.
जे दायित्व पार पाडतनारायणमामांनी स्वतःची संघ साधना पूर्ण केली.

संदर्भ व संपर्कसूत्र - श्री धनंजय नारायणराव देशपांडे (९४२१४५९८२६)रा.स्व.संघ जणकल्याण समितीनांदेड़ विभाग कार्यवाह

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

संघ शिक्षा वर्ग एक साधना

संघ शिक्षा वर्ग एक साधना

साधनेचे तीन प्रसंग

व्रतस्थ व्यक्तीला साधना पूर्ण करत असताना अनेक दिव्यातून जावं लागतं. स्वीकारलेलं व्रत हे पूर्ण जाणिवेतून झालेला निर्णय असतो. मग अशा वेळी कोणतीही अडचण ही साधनेत बाधा आणूच शकत नाही तर ती साधना अधिक सक्षम आणि परिपूर्ण करण्यासाठी येत असते.

असेच संघ शिक्षा वर्ग या रा.स्व.संघाच्या प्रशिक्षण वर्गात स्वयंसेवकांनी केलेल्या साधनेचे देखील असेच आहे.

अशाच काही स्वयंसेवकांचे प्रेरक अनुभव.

श्री रविजी देशपांडे (९९८७५३९०८५), देवगिरी प्रांताचे पहिले शारिरीक शिक्षण प्रमुख व वर्तमान रा. स्व. संघ जनकल्याण समिती, देवगिरी संभागाचे कोषाध्यक्ष यांनी सांगितलेले दोन अनुभव.


साधनेचा पहिला प्रसंग

१९६९ चा संघ शिक्षा वर्ग - प्रथम वर्ष पुणे येथे सुरू होते.
परभणी जिल्ह्यातून काही स्वयंसेवक वर्गात उपस्थित होते.
त्यापैकी एका स्वयंसेवकाला, सेलू या गावातील दर दोन-तीन दिवसांनी मनिऑर्डर येत होती.
स्वाभाविकच सगळ्यांना याचे आश्चर्य वाटत होते. मग त्यावेळेचे परभणी जिल्हा प्रचारक श्री जनुभाऊ रानडे यांनी सांगितले,
या स्वयंसेवकाचा सेलू येथे खेळाचा गाडा आहे. आणि तो त्याने त्याच्या मित्राला चालवायला दिला आहे. रोजच्या विक्रीतून होणारा नफा दोघेजण वाटून घेतात. 
आणि या स्वयंसेवकाच्या वाट्यातील नफा, तो मित्र मनिऑर्डर करून पाठवतो. परिस्थिती इतकी नाजूक आहे की, वर्गाचे शुल्क देखील याच टप्प्याटप्प्याने भरले जात आहे...
----------


साधनेचा दुसरा प्रसंग

१९९२ चे संघ शिक्षा वर्ग द्वितीय वर्ष पुणे येथे सुरू होते. आणि एके दिवशी पू. सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांचा वर्गात प्रवास होता.
आणि त्या दिवशी रात्रीच्या कार्यक्रमात बाळासाहेबांसोबत व्यासपीठावर एका ज्येष्ठ स्वयंसेवकाला आमंत्रित करण्यात आले.
ते होते श्री भाऊराव बेलवलकर.
तो दिवस संघजीवनातील अभूतपूर्व दिवस होता.
तो दिवस एका अर्थाने भाऊरावांच्या कर्तव्याचा आणि कर्तृत्वाचा सोहळा साजरा करणारा होता.
कारण त्याला उपस्थिती देखील प्रत्यक्ष सरसंघचालकांची लाभली होती.
आणि या प्रसंगाचे विशेष कारण होते.
ते म्हणजे, भाऊरावांनी एका गृहस्थाश्रमी, पोष्टात लिपिक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी, गेली पन्नास वर्ष सतत संघ शिक्षा वर्गात शिक्षक म्हणून उपस्थिती ठेवली होती.
वर्षात नोकरीमध्ये मिळणारी रजा ते संघशिक्षा वर्गासाठी वाचवून ठेवायचे. कौटुंबिक व व्यवसायिक किती अडचणी आल्या असतील याची केवळ कल्पनाच केलेली बरी.
आणि असे करत भाऊरावांनी त्यांच्या साधनेची ५० वर्षे पूर्ण केली होती.
---------- 


साधनेचा तिसरा प्रसंग

माझे विज्ञान शाखेचे पदवीचे तिसरे वर्ष व संघ शिक्षा वर्गाचे तृतीय वर्ष एकामागे एक, असे पूर्ण झाले. २००२ साल होते. 
हिंगोली जिल्ह्यातून तृतीय वर्षासाठी हिंगोली जिल्हा म्हणून पहिला स्वयंसेवक म्हणून मी उपस्थित होतो. तृतीय वर्षात येऊन संघाचे विराटरूप पाहण्याचा, अनुभवण्याचा आनंद होताच.

बाबांनी वर्गाला जाताना सांगून ठेवले होते की, रोज नव्या स्वयंसेवकाजवळ जेवायला बसायचे. त्यानिमित्ताने अन्य प्रांतातील स्वयंसेवकांचा परिचय तर होईलच पण कार्याची माहिती देखील मिळेल.

आणि असेच एका दिवशी दुपारच्या भोजनासाठी एका ज्येष्ठ स्वयंसेवका शेजारी बसलो. परिचय झाला.
ते दिल्ली येथील व्यापारी होते. आणि एका भागाचे भाग कार्यवाह असे त्यांच्याकडे दायित्व होते.

व्यावसायिक, कौटुंबिक चौकशीनंतर मी त्यांना म्हणालो, “आपले द्वितीय वर्ष कधी झाले?”
“बारा वर्षांपूर्वी”, असे त्यांनी उत्तर दिले.
मी अंदाज घेवून म्हणालो, “स्वभाविकच, व्यवसायातून सुट्टी काढायला जमले नसेल ना!”
त्यावर स्मित हास्य करत ते म्हणाले, “गेली बारा वर्षे झाले, मी तृतीय वर्षात येण्याची परवानगी काढतो आहे.
पण प्रत्येक वेळेस मला सांगितले जायचे की, अजून एक वर्ष दायित्वाचा अनुभव घ्या आणि मग पुढच्या वर्षी तृतीय वर्षात जा.”



या वाक्यानंतर मात्र मी काहीही बोलू शकलो नाही. त्यांच्या साधनेच्या बारा वर्षांसमोर नतमस्तक होऊन, भोजन आटपून निघालो...


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

श्रद्धेची संघ प्रार्थना


हिंगोली जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी बैठक हिंगोली येथे सुरू होती. २००१ सालची गोष्ट आहे. बैठकीस मा. मधुकरराव जोशी उपस्थित होते.
पाचशेपेक्षा जास्त सांघिक व वैयक्तिक पद्य पाठ असलेले प्रचारकअसे त्यांच्या विषयी तोपर्यंत मी ऐकलेले होते. बैठकीत पहिल्यांदाच त्यांची भेट झाली. खूप छान वाटले. आनंद झाला.

मग पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच मला सांघिक पद्य सांगण्यास सांगितले गेले. मी सांघिक पद्य सांगितले. पण पद्य सांगत असताना आमचे त्यावेळेसचे वसमत तालुका प्रचारक श्री महेशजी जोशी गालातल्या गालात एकदा-दोनदा हसले. 
ते कामला कळाले नाही.
सत्र झाल्यानंतर मी तसे त्यांना विचारले. त्यावर महेशजी म्हणाले, "अरेएक तरी ओळ तू तालासुरात गायला का?  मधुकररावांनी तुझ्या मागे एक ओळ सुद्धा  म्हंटली नाही."

झालं. मी ठाम निश्चय केला. तसे मला पूर्वीपासून ठाऊक होतेच आपल्याला पद्य म्हणता येत नाही. पण आता इथून पुढे फजिती करून घ्यायची नाही.
'सांघिक गीत म्हणायचं नाहीवैयक्तिक गीताचा तर प्रश्नच येत नाही. आणि अगदी प्रार्थनाही कोणी म्हणायला सांगितले तर म्हणायचे नाही', असे मी ठरवून टाकले. 
असा माझा संकल्प ठाम झाला होता.

पण नंतर कळले कीतो संकल्प फार काळ टिकणारा नव्हता. चार सहा महिन्यानंतर वसमत तालुक्याची बैठकीत त्याला अनुसरून असा प्रसंग घडला.

बैठकीचा समारोप झाला. आता प्रार्थना होऊन बैठक संपणार होती. तोच मुख्य शिक्षकांनी जसे अग्रेसर सांगितलेतसेच प्रार्थना म्हणण्यास मला सांगितले.
एवढ्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर मला 'नाहीम्हणता आले नाही.

मग मी प्रार्थना सांगितली. प्रार्थना चुकली नाही. पण तिसरी ओळ खाली येणे,  बाकीच्या वेळी नियमित आवाजात म्हणणेअसे संगीतबद्ध पद्धतीत अर्थातच मला त्या काही केल्या जमल्या नव्हत्या.

बैठकीला विनयजी कानडेत्यावेळसचे नांदेड विभाग प्रचारक उपस्थित होते. मी विचार केला आता थेट त्यांच्या कानावर गोष्ट घालूया. म्हणजे आपल्याला यातून सुटून जातील. म्हणून मी त्यांना म्हणालो, "मला प्रार्थना तालासुरात म्हणता येत नाही. तेव्हा कृपया 'मला कोणत्याही बैठकीत प्रार्थना सांगण्यास सांगू नये', असे तुम्ही सगळ्यांना सांगा."

सगळे ऐकून घेऊन अगदी शांतपणे विनयजी म्हणाले, "संघाची प्रार्थना तालासुरात म्हणता येईलही. पण तू तालासुरावर नको लक्ष देऊ. कारण तालासुरां पेक्षाही प्रार्थना श्रद्धेचा अधिक विषय आहे. त्यामूळे तू फक्त प्रार्थना श्रद्धेने म्हणायचा प्रयत्न कर."

तात्पर्य एवढ्या सोप्या पद्धतीने 'संघ प्रार्थना', 'संघकार्यकेवळ समजावूनच घ्यायचे नाही तर ते श्रद्धेने करायचे आणि जगायचेहा तो या प्रसंगातून संदेश होता.

संदर्भ व संपर्कसूत्र :- श्री विनयजी कानडे - ७५८८० ७६१६१
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

आपले प्रेरणास्थान


नेताजी सायं शाखा.
संभाजीनगर शहरातीलबन्सीलाल नगर परिसरातील सर्व आयमांनी अशी परिपूर्ण शाखा. शाखा संच. शाखा बैठक. निवासी वर्ग. घोष वर्ग. मासिक उपक्रम.
असे सर्व उपक्रमकार्यक्रम नियमितपणे करणारी शाखा.

२०१० ते आजपर्यंत असे नेताजी सायं शाखेचे नित्य संघकार्य नियिमीत सुरू आहे. याचे महत्त्वाचे कारण हेच कीशाखेचा पाया या सगळ्या गोष्टींनी भक्कमरित्या भरला गेला आहे. 
आणि त्याची सुरुवात २०१० सालचा शाखा कार्यवाह श्री कांताप्रसाद कोडीहाळ याने केली.

कांताप्रसाद पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होता. स्वतः घोष वादक त्यामुळे शाखेतील पंधरा ते वीस बाल ही वंशी वादक म्हणून तयार झाले होते. अशी नेताजी सायं सलग तीन वर्ष सुरु होती.

आणि २०१३ साली असेच एके दिवशी कांताप्रसादचा फोन आलाखूप आनंदीत होत.
म्हणाला, "आज पॉलिटेक्निकच्या  अंतिम वर्षात मी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झालो आहे. पण हे करू शकलो कारण नियोजन कसे करायचेहे मी शाखेतून शिकलो आहे. आणि म्हणून अगदी अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या दिवसात एकही दिवस शाखा कधी चुकवली नाही."

अर्थातच त्याने मिळवलेल्या यशाचे आणि  सांभाळल्या दायित्वाची अभिनंदन केले.

पण प्रसंग माझ्यासाठी एवढ्यावरच थांबणार नव्हता. नंतर हा आनंदाचा प्रसंग त्यावेळेस शहर कार्यवाह श्री धनंजयराव धामणे यांना सांगावाम्हणून मी त्यांना फोन केला. तर तत्पूर्वीच कांताप्रसादने त्यांना सांगितले होते.
पण मी धनंजयरावांना फोन केल्यावर मला खूप लाभ झाला. संघकार्य करत असतानाचा नवा दृष्टिकोन मिळाला.

धनंजयराव म्हणाले, " संघकार्य करत असताना आपले प्रेरणास्थान थोर महापुरुष असतातच. पण प्रत्येकवेळी वर पाहूनच नाही चालायचे. तर आपल्या सहकार्‍यांकडेही पाहायचे.
कारण अशी प्रेरणा देणारे कांताप्रसाद सारखे आपले सहकारी देखील आपले प्रेरणास्थान असले पहिजेत."

संदर्भ व संपर्कसूत्र : - श्री कांताप्रसाद कोडीहाळ - ७७५७८ २३९९९


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९


मा.अण्णा गोसावी यांची एक आठवण


२००० सालचे जिल्ह्याचे हेमंत शिबिर हिंगोली येथे सुरू होतेमी शिबिराचा मुख्य शिक्षक होतो.
माझी वसमत येथील शाखा सुरू होऊन एकच वर्ष होत होतेजिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकर्त्यांचा छान परिचय झाला होता.
पण शिबिरप्रमुख या जबाबदारीचं नाही म्हटलं तरी दडपण होतंच.
पहिलाच अनुभव होता आणि त्यात पहिल्याच दिवशी निरोप मिळाला कीसमारोपाला मा.प्रांत संघचालक-अण्णा गोसावी येणार आहेत.

आता अजूनच दडपण वाढलेकारण तोपर्यंत विभागप्रांत कार्यकर्त्यांचा परिचय किंवा थेट भेट झालेली नव्हती.
आणि बाहेरच्या जगाप्रमाणे आपली काय काय चौकशी होईलयाची काळजी अधिक लागली होती.

समारोपाचा दिवस उजाडलादुपारच्या भोजनाची वेळ झाली होतीमी ही जेवायला बसलो होतो.
निरोप मिळाला अण्णा आले आहेततसाच उठून बाहेर संघस्थानावर गेलोशिट्टी संकेत दिला.
त्यांनंतर मा.शिबिर अधिकारी अण्णांना घेऊन आलेत्यांच्या भोजनानंतर परिचय झाला.
पण वाटलेल्या भितीप्रमाणे काहीही घडले नाहीउलटपक्षी परिचयानंतर अण्णांनी वैयक्तिक चौकशी केली.
ज्यामुळे आधार अधिक वाटलाजबाबदारी हलके झाल्यासारखे वाटले.

आणि पुढील समारोप आयुष्यभरासाठी दिशादर्शक ठरला.

अण्णा समारोपात म्हणाले, “संघाच्या शाखेत येण्यापूर्वी किंवा शिबिराच्या माध्यमातून जे संघात पहिल्यांदा आले आहेत,
अशा सगळ्यांनाचतुम्हाला आजवर समाजात ‘मुलं’ म्हणून संबोधलं जात असेल कदाचित कुणी ‘पोरं असेही म्हणत असतील,
हाक मारत असतीलपण संघात आल्यावर तुम्हा सगळ्यांना एक नवीन ओळख मिळाली आहे.
तुम्ही आता मुलं राहिलेली नाही आहात तर ‘स्वयंसेवक’ झाले आहात.”

२००० ते आजवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
शाखा कार्यवाह ते जिल्हा सहकार्यवाह अशा अनेक स्तरावर काम करायला मिळालंआनंद मिळालाशिकायला मिळाले
पण अण्णांनी ‘स्वयंसेवक’ म्हणून करून दिलेली ओळख आजही अधिक स्पष्ट आहे.
आणि ज्या ज्या वेळेस प्रसंग आठवतो, त्या त्या वेळेस ‘स्वयंसेवक’ असण्याचा आनंद अधिक अधिक होत जातो. . .

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

बरे झाले, पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले...

विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात होतो. परंतु विज्ञान सोबतच वाद-विवाद, वक्तृत्व, कविता, कथाकथन, एकांकिका असे एकंदरीतच कलेशी जास्त नाळ जोडली गेली...