Friday, 15 November 2019

श्रद्धेची संघ प्रार्थना


हिंगोली जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी बैठक हिंगोली येथे सुरू होती. २००१ सालची गोष्ट आहे. बैठकीस मा. मधुकरराव जोशी उपस्थित होते.
पाचशेपेक्षा जास्त सांघिक व वैयक्तिक पद्य पाठ असलेले प्रचारकअसे त्यांच्या विषयी तोपर्यंत मी ऐकलेले होते. बैठकीत पहिल्यांदाच त्यांची भेट झाली. खूप छान वाटले. आनंद झाला.

मग पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच मला सांघिक पद्य सांगण्यास सांगितले गेले. मी सांघिक पद्य सांगितले. पण पद्य सांगत असताना आमचे त्यावेळेसचे वसमत तालुका प्रचारक श्री महेशजी जोशी गालातल्या गालात एकदा-दोनदा हसले. 
ते कामला कळाले नाही.
सत्र झाल्यानंतर मी तसे त्यांना विचारले. त्यावर महेशजी म्हणाले, "अरेएक तरी ओळ तू तालासुरात गायला का?  मधुकररावांनी तुझ्या मागे एक ओळ सुद्धा  म्हंटली नाही."

झालं. मी ठाम निश्चय केला. तसे मला पूर्वीपासून ठाऊक होतेच आपल्याला पद्य म्हणता येत नाही. पण आता इथून पुढे फजिती करून घ्यायची नाही.
'सांघिक गीत म्हणायचं नाहीवैयक्तिक गीताचा तर प्रश्नच येत नाही. आणि अगदी प्रार्थनाही कोणी म्हणायला सांगितले तर म्हणायचे नाही', असे मी ठरवून टाकले. 
असा माझा संकल्प ठाम झाला होता.

पण नंतर कळले कीतो संकल्प फार काळ टिकणारा नव्हता. चार सहा महिन्यानंतर वसमत तालुक्याची बैठकीत त्याला अनुसरून असा प्रसंग घडला.

बैठकीचा समारोप झाला. आता प्रार्थना होऊन बैठक संपणार होती. तोच मुख्य शिक्षकांनी जसे अग्रेसर सांगितलेतसेच प्रार्थना म्हणण्यास मला सांगितले.
एवढ्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर मला 'नाहीम्हणता आले नाही.

मग मी प्रार्थना सांगितली. प्रार्थना चुकली नाही. पण तिसरी ओळ खाली येणे,  बाकीच्या वेळी नियमित आवाजात म्हणणेअसे संगीतबद्ध पद्धतीत अर्थातच मला त्या काही केल्या जमल्या नव्हत्या.

बैठकीला विनयजी कानडेत्यावेळसचे नांदेड विभाग प्रचारक उपस्थित होते. मी विचार केला आता थेट त्यांच्या कानावर गोष्ट घालूया. म्हणजे आपल्याला यातून सुटून जातील. म्हणून मी त्यांना म्हणालो, "मला प्रार्थना तालासुरात म्हणता येत नाही. तेव्हा कृपया 'मला कोणत्याही बैठकीत प्रार्थना सांगण्यास सांगू नये', असे तुम्ही सगळ्यांना सांगा."

सगळे ऐकून घेऊन अगदी शांतपणे विनयजी म्हणाले, "संघाची प्रार्थना तालासुरात म्हणता येईलही. पण तू तालासुरावर नको लक्ष देऊ. कारण तालासुरां पेक्षाही प्रार्थना श्रद्धेचा अधिक विषय आहे. त्यामूळे तू फक्त प्रार्थना श्रद्धेने म्हणायचा प्रयत्न कर."

तात्पर्य एवढ्या सोप्या पद्धतीने 'संघ प्रार्थना', 'संघकार्यकेवळ समजावूनच घ्यायचे नाही तर ते श्रद्धेने करायचे आणि जगायचेहा तो या प्रसंगातून संदेश होता.

संदर्भ व संपर्कसूत्र :- श्री विनयजी कानडे - ७५८८० ७६१६१
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

1 comment:

  1. एकदम बरोबर प्रार्थनेसाठी मनातून श्रद्धा असणे हेच आवश्यक आहे असे मलाही वाटते.

    ReplyDelete

बरे झाले, पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले...

विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात होतो. परंतु विज्ञान सोबतच वाद-विवाद, वक्तृत्व, कविता, कथाकथन, एकांकिका असे एकंदरीतच कलेशी जास्त नाळ जोडली गेली...