नेताजी सायं शाखा.
संभाजीनगर शहरातील, बन्सीलाल नगर परिसरातील सर्व आयमांनी अशी परिपूर्ण शाखा. शाखा संच. शाखा बैठक. निवासी वर्ग. घोष वर्ग. मासिक उपक्रम.
असे सर्व उपक्रम, कार्यक्रम नियमितपणे करणारी शाखा.
२०१० ते आजपर्यंत असे नेताजी सायं शाखेचे नित्य संघकार्य नियिमीत सुरू आहे. याचे महत्त्वाचे कारण हेच की, शाखेचा पाया या सगळ्या गोष्टींनी भक्कमरित्या भरला गेला आहे.
आणि त्याची सुरुवात २०१० सालचा शाखा कार्यवाह श्री कांताप्रसाद कोडीहाळ याने केली.
कांताप्रसाद पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होता. स्वतः घोष वादक त्यामुळे शाखेतील पंधरा ते वीस बाल ही वंशी वादक म्हणून तयार झाले होते. अशी नेताजी सायं सलग तीन वर्ष सुरु होती.
आणि २०१३ साली असेच एके दिवशी कांताप्रसादचा फोन आला, खूप आनंदीत होत.
म्हणाला, "आज पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षात मी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झालो आहे. पण हे करू शकलो कारण नियोजन कसे करायचे, हे मी शाखेतून शिकलो आहे. आणि म्हणून अगदी अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या दिवसात एकही दिवस शाखा कधी चुकवली नाही."
अर्थातच त्याने मिळवलेल्या यशाचे आणि सांभाळल्या दायित्वाची अभिनंदन केले.
पण प्रसंग माझ्यासाठी एवढ्यावरच थांबणार नव्हता. नंतर हा आनंदाचा प्रसंग त्यावेळेस शहर कार्यवाह श्री धनंजयराव धामणे यांना सांगावा, म्हणून मी त्यांना फोन केला. तर तत्पूर्वीच कांताप्रसादने त्यांना सांगितले होते.
पण मी धनंजयरावांना फोन केल्यावर मला खूप लाभ झाला. संघकार्य करत असतानाचा नवा दृष्टिकोन मिळाला.
धनंजयराव म्हणाले, " संघकार्य करत असताना आपले प्रेरणास्थान थोर महापुरुष असतातच. पण प्रत्येकवेळी वर पाहूनच नाही चालायचे. तर आपल्या सहकार्यांकडेही पाहायचे.
कारण अशी प्रेरणा देणारे कांताप्रसाद सारखे आपले सहकारी देखील आपले प्रेरणास्थान असले पहिजेत."
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
No comments:
Post a Comment