Friday, 15 November 2019

नारायणमामा


बहुदा 'स्वयंप्रेरणाहीच 'स्वयंसेवकहोण्याचीअसण्याची किंवा घडण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची बाब आहे.

म्हणूनच 'स्वयंसेवकहे दायित्व संघ निर्मात्या डॉ.हेडगेवार यांनी व्यक्ती निर्माणाच्या या संघकार्यात सर्वतोपरी मानले आणि प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनात अनेक उदाहरणे देखील प्रस्थापित केलेली आहेत.

आणि म्हणूनच की कायपुढे अशी  'स्वयंसेवकअसण्याची अनेक उदाहरणे अनेक स्वयंसेवकांच्या जीवनात आलेली पाहायला मिळतात. त्यातीलच एक उदाहरण...

नारायण मामा.
मामा होतेते आईचे. परंतु व्यक्तिमत्त्व असे कीनातवंडांनीही 'मामाम्हणावं.

अपार कष्टाने शेतात काम करून कमावलेली शरीरयष्टी. पिळदार देह. रुबाबदार असं व्यक्तिमत्व.
पूर्णेच्या च्या हिवाळी शिबिरात(८७ किंवा ८८ साली) त्यांना भेटल्याचंपाहिल्याचं आजही स्पष्टपणे पण आठवतं. संचलनात घोड्यावर ध्वज घेऊन बसले होते.
तसेच शिबिर म्हटलं कीप्रत्येक वेळेस नारायण मामा स्वयंपाक विभागात असायचे.

सावंगीया परभणी जिल्ह्यातील एका छोट्या गावातील रहिवासी.

नातेवाईकांच्या देखील अनेक लग्नात कोठीघराची जबाबदारी नकळतपणे त्यांच्याकडेच असायची. आई सांगते की८७ साली मावशीच्या लग्नातजेव्हा आचारी पोहोचला नव्हतातेव्हा जेवणाची वेळ जवळ येत आहे असे पाहून नारायणमामांनी स्वतः आढी(चूल) तयार केली. विटा मातीनी सारवल्या. चूल पेटवली. वरण शिजायला टाकले. आणि ते शिजत आल्या नंतर केव्हातरी आचारी आला.
अर्थात कोणतीही गोष्ट स्वीकारल्यानंतर ती मुळापासून आणि पूर्णपणे करायची. त्याकरिता कोणाचीही वाट पाहायची नाही.

अशी सर्व भूमिकेतून स्वयंसेवक म्हणून नारायणमामा स्वतःची साधना पूर्ण करत होते.

आणि एके दिवशी त्यांच्या साधनेचा परमोच्च बिंदू येण्याचा प्रसंग आला.

१९६५ वर्ष होते.
श्रीगुरुजी सेलू येथे येणार होते. परभणी जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवकांची त्यानिमित्ताने बैठक ठेवलेली होती. नारायणमामा देखील बैठकीला जाणार होते.

पण बैठकीच्या दोन-तीन दिवस आधी घरात मुलीचा जन्म झाला. आणि त्यानंतर मात्र मुलीची प्रकृती खालावत गेली. आणि बैठकीच्याच दिवशी मुलगी जात राहिली.

घरात शोकाकुल वातावरण तयार झालं. दुःखाला पारावार नव्हता. पण नारायणमामांनी शोक आवरला. अक्षरशः पत्नीच्यामांडीवरून मुलीला उचलून घेतलं. स्वतः पुढाकार घेऊन विधीवत अंत्यसंस्कार केले. आणि घरी येऊन आंघोळ आदी आटपून पुढच्या कोणत्याही बंधनात न अडकता बैठकीला निघून गेले.

वस्तुस्थितीत नारायणमामांकडे बैठकीचे कोणतेही दायित्व नव्हते. केवळ 'स्वयंसेवकहेच दायित्व होते.
जे दायित्व पार पाडतनारायणमामांनी स्वतःची संघ साधना पूर्ण केली.

संदर्भ व संपर्कसूत्र - श्री धनंजय नारायणराव देशपांडे (९४२१४५९८२६)रा.स्व.संघ जणकल्याण समितीनांदेड़ विभाग कार्यवाह

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

No comments:

Post a Comment

बरे झाले, पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले...

विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात होतो. परंतु विज्ञान सोबतच वाद-विवाद, वक्तृत्व, कविता, कथाकथन, एकांकिका असे एकंदरीतच कलेशी जास्त नाळ जोडली गेली...